शिक्षण मंडळ सभापती निवड १३ आॅक्टोबरला

By admin | Published: October 2, 2015 01:09 AM2015-10-02T01:09:55+5:302015-10-02T01:14:11+5:30

इचलकरंजी नगरपालिका : तब्बल सात महिन्यांनी निवड होणार असल्याने उत्सुकता

The Board of Education of the Board of Education selected October 13 | शिक्षण मंडळ सभापती निवड १३ आॅक्टोबरला

शिक्षण मंडळ सभापती निवड १३ आॅक्टोबरला

Next

इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाकडील सभापतिपदाची निवडणूक तब्बल सात महिन्यांनी होऊ घातली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले यांनी निवडणुकीसाठी १३ आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.
सन २०१३ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाची निवडणूक होऊन त्यामध्ये कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक व शहर विकास आघाडीचे तीन सदस्य निवडले गेले. कॉँग्रेसकडे असणाऱ्या सहा सदस्यांना सभापतिपदाची संधी देण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरविले.
फेब्रुवारी २०१५ मध्ये तौफिक मुजावर यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. मात्र, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन केलेल्या बंडामुळे तेथील बदललेल्या राजकीय स्थितीचे पडसाद शिक्षण मंडळातही उमटले. उपसभापती नितीन कोकणे यांच्याकडे प्रभारी सभापतिपदाचा पदभार असताना त्यांनी ठरलेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत सभापतिपदाची निवडणूक लावली नाही. शिक्षण अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यापर्यंत सभापतीची निवडणूक लावली नाही. म्हणून कॉँग्रेसच्या सदस्यांनी निवडणूक घेण्याबाबत जोरदार मोहीम उघडली. अखेर शिक्षण अधिकारी चौगुले यांनी १३ आॅगस्ट रोजी सभापतिपदाची निवडणूक जाहीर केली. मात्र, शिक्षण मंडळाकडे शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली नसल्याने मंडळाची संख्या अपूर्ण आहे. सभापती निवड अशी तक्रार शहर विकास आघाडीचे सदस्य राजू हणबर यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी सभापतीच्या निवडणुकीस स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात शिक्षण मंडळावर विलास रानडे व जया हुरकट या दोघा भाजप पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)

शिक्षण मंडळातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कॉँग्रेसकडे सहा, तर राष्ट्रवादी-शहर विकास आघाडी यांचे मिळून सहा सदस्य असे बलाबल झाले आहे. परिणामी गटशिक्षण अधिकारी यांना या निवडणुकीस उपस्थित राहण्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी-‘शविआ’च्या बाजूने मतदान करावे.

ज्यामुळे कॉँग्रेसच्या विरोधातील सभापती निवड केली जाईल, अशी राजकीय खेळी करण्याची तयारी ‘शविआ’ने केली आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनी होणाऱ्या सभापति-पदाच्या निवडीमध्ये रंगत येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: The Board of Education of the Board of Education selected October 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.