कोल्हापुरातील इचलकरंजीत पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती, सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:15 PM2023-08-10T12:15:00+5:302023-08-10T12:15:45+5:30

इचलकरंजी : क्रांती दिनानिमित्त शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेण्यात आल्या. त्यामध्ये सांगलीवाडीच्या ...

Boat races in river Panchganga at Ichalkaranjit in Kolhapur, Tarun Maratha Boat Club of Sangliwadi A first | कोल्हापुरातील इचलकरंजीत पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती, सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम

कोल्हापुरातील इचलकरंजीत पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती, सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम

googlenewsNext

इचलकरंजी : क्रांती दिनानिमित्त शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेण्यात आल्या. त्यामध्ये सांगलीवाडीच्या ‘तरुण मराठा बोट क्लब अ’ने प्रथम क्रमांक मिळविला.

सांगलीवाडीच्याच रॉयल बोट क्लबने द्वितीय, कवठेपिरानच्या सप्तर्षी बोट क्लबने तृतीय आणि इचलकरंजीच्या वरदविनायक बोट क्लबने चौथा क्रमांक पटकावला. शर्यतीचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठांवर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकिनांनी गर्दी केली होती. प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या वतीने देण्यात आली आहे.

स्पर्धेनंतर आमदार प्रकाश आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे, महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, श्रीनिवास बोहरा, इचलकरंजी जनता बॅँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शेखर शहा, बाळासाहेब जांभळे, बाळासाहेब कलागते, नंदू पाटील, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, संपत जामदार, राजेंद्र बचाटे, तानाजी कोकीतकर, सागर गळदगे, राहुल घाट, आदी उपस्थित होते.

Web Title: Boat races in river Panchganga at Ichalkaranjit in Kolhapur, Tarun Maratha Boat Club of Sangliwadi A first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.