Kolhapur: तुळशी धरणाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह, सडल्यामुळे ओळख पटवणे अडचणीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:29 IST2024-09-20T16:27:32+5:302024-09-20T16:29:26+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड : येथील तुळशी धरणाच्या पायथ्याशी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली ...

Kolhapur: तुळशी धरणाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह, सडल्यामुळे ओळख पटवणे अडचणीचे
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : येथील तुळशी धरणाच्या पायथ्याशी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. मृतदेह संपूर्ण सडल्यामुळे ओळख पटवणे अडचणीचे झाले आहे.
गावातील एक नागरीक जंगलात जनावरे घेऊन गेला असता त्याला हा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती राधानगरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. याबाबतचा पुढील तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस एस गोरे यांच्या मार्गदर्शांनाखाली सुरु आहे.