कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 06:33 PM2022-09-21T18:33:22+5:302022-09-21T18:33:56+5:30

पोहण्यासाठी उडी मारली अन् पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने राकेश पाण्याच्या वेगवान प्रवाहात भोवऱ्यात सापडून बुडाला.

Body of drowned youth found near Shingnapur dam kolhapur | कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला

कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला

Next

कोपार्डे : शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह आज, बुधवारी पंचगंगा घाटाजवळ सापडला. राकेश प्रकाश पोलादे (वय ४०, रा. जाधवाडी) असे या मृत युवकाचे नाव आहे. घरातील कपडे व अंथरूण धुऊन झाल्यानंतर बंधाऱ्याजवळ नदी पात्रातील पाण्यात आंघोळ करत असताना राकेश बुडाला होता. अग्निशमन दलाला राकेशचा मृतदेह शोधण्यात आज यश आले. ही घटना काल, मंगळवारी दुपारच्या दरम्यान घडली होती.

दसरा असल्याने राकेश आपल्या पत्नी व मुलासह जाधवाडीतून शिंगणापूर बंधाऱ्याजवळ असलेल्या घाटावर कपडे, अंथरूण धुण्यासाठी आले होते. कपडे धुऊन झाल्यानंतर राकेश यांनी बंधाऱ्याजवळ आंघोळ करण्यास सुरुवात केली. पट्टीचा पोहणारा राकेश यांनी बंधाऱ्यावरून पुर्वेला नदीच्या पात्रात उडी मारली. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने राकेश पाण्याच्या वेगवान प्रवाहात पोहताना भोवऱ्यात सापडला व बुडू लागला. कुणाच्या लक्षात येण्या अगोदरच काही क्षणातच ते पाण्यात दिसेनासे झाला.

शिंगणापूर बंधाऱ्याजवळ घाटावर आंघोळीसाठी व धुण्यासाठी प्रचंड गर्दी होती. पण वेगवान प्रवाहाने राकेशला मदत मिळण्या अगोदरच तो पाण्याबरोबर वाहून गेला. मंगळवारी अग्निशमन दलाने आपत्कालीन दलाच्या बोटीच्या साहाय्याने पंचगंगेच्या घाटापर्यंत शोधमोहीम राबवली. पण सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी पंचगंगा घाटाजवळ राकेशचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या सुरेश मर्दाने, युवराज लाड, विशांत चव्हाण या जवानांनी शोध मोहीम पुर्ण केली.

चार महिन्यात चौघांचा मृत्यू

शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पाण्याला प्रचंड वेग असतो. शहरातून काही लोक येथे कपडे धुण्यासाठी येतात आणि येथे आंघोळ करताना वेगवान प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने पाण्यात बुडतात. जून महिन्यात एकाच दिवशी कोल्हापूरातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. गेल्या सहा महिन्यांत चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Web Title: Body of drowned youth found near Shingnapur dam kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.