जोतिबा येथे तलाव्यात मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:14+5:302021-02-07T04:23:14+5:30

कोडोली : जोतिबा (ता. पन्हाळा) येथील चव्हाण तलावात शनिवारी मधुकर गणपती ठाकरे (वय ७०) यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ...

A body was found in a lake at Jotiba | जोतिबा येथे तलाव्यात मृतदेह सापडला

जोतिबा येथे तलाव्यात मृतदेह सापडला

Next

कोडोली : जोतिबा (ता. पन्हाळा) येथील चव्हाण तलावात शनिवारी मधुकर गणपती ठाकरे (वय ७०) यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून, याबाबतची माहिती किरण ठाकरे यांनी पोलिसात दिली आहे. जोतिबा येथील ठाकरे मिटके गल्ली येथील मधुकर ठाकरे हे अविवाहित होते तसेच त्यांना दारूचे व्यसन होते. ते रविवार, ३१ जानेवारी रोजी न सांगता घरातून निघून गेले होते. यावेळी नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, ते सापडले नव्हते. यापूर्वीही ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. शनिवारी सकाळी तलावात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक कुंभार व सुतार करत आहेत.

Web Title: A body was found in a lake at Jotiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.