शरीर सौष्ठवपटूंचा कॅन्सरशी लढा, समाजाची मदतीतून साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:19+5:302021-04-25T04:24:19+5:30
पट्टणकोडोली येथील किरण चौगुले हे एक शरीर सौष्ठवपट्टू असून मनमिळावू आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ते खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ...
पट्टणकोडोली येथील किरण चौगुले हे एक शरीर सौष्ठवपट्टू असून मनमिळावू आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ते खासगी कंपनीत नोकरीस आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांना शारीरिक त्रास जाणवत होता. मात्र योग्य निदान लागले नव्हते. त्यांना जास्त त्रास जाणवत असल्याने सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे किरण यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांच्या उपचाराचा खर्च दहा लाखाचा सांगितला. घरची परिस्थिती बेताची आणि कर्त्या माणसालाच कॅन्सर रोगाने जखडल्याने चौगुले कुटुंबावर आभाळच कोसळले. यावेळी ही बातमी त्यांच्या मित्रमंडळींना कळाली आणि त्यांनी चौगुले कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सोशल मीडियावर आवाहन केले. त्यानुसार पट्टणकोडोली येथील जैन समाजाच्या अध्यक्षांच्या आवाहनानुसार समाजातील लोकांनी दीड लाख रुपये गोळा केले तर दानपेटीतील ५० हजार रुपये असे दोन लाख रुपये गोळा करून चौगुले कुटुंबीयांना दिले. तसेच कंपनीतील मित्र मंडळींनी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
फोटो : २४ किरण चौगुले