बोगस बालरोगतज्ज्ञास चोप

By admin | Published: May 8, 2016 12:34 AM2016-05-08T00:34:15+5:302016-05-08T00:34:15+5:30

धारेवर धरताच वेगवेगळी उत्तरे देऊ लागला

Bogas pediatrician chopped | बोगस बालरोगतज्ज्ञास चोप

बोगस बालरोगतज्ज्ञास चोप

Next

तुरंबे : कुपोषित बालकांना महिन्याला पाचशे रुपये अनुदान देतो म्हणून सांगणाऱ्या एकाला राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील ग्रामस्थांनी चोप दिला. आपण बालरोगतज्ज्ञ असून, शासनाच्या वतीने अधिकारी म्हणून पाठविले असल्याचे त्याने सांगितले. तो आपले नाव गोखले असल्याचे सांगत होता.
राधानगरी तालुक्यात शनिवारी शेळेवाडी, तुरंबे, आदी गावांत मी बालरोगतज्ज्ञ आहे, असे सांगून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून त्यांना महिन्याकाठी ५०० रुपयांचे अनुदान मिळवून देतो, असे सांगून अनेकांकडून मोठी रक्कम गोळा केली. याची शंका आल्याने जागरूक पालकांनी व अंगणवाडीतील सेविका व मदतनिसानी त्याला जाब विचारला. धारेवर धरताच तो वेगवेगळी उत्तरे देऊ लागला. यासंदर्भात त्याला विचारले असता, तालुक्यात पैसे दिले तर तुमचे काम होईल, असेही त्याने अनेकांना सांगितले होते. महिला बालविकास प्रकल्प विभागातून रात्री उशिरा हा तोतया असल्याचे अंगणवाडीसेविका मुल्ला यांनी सांगितले.

Web Title: Bogas pediatrician chopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.