कोरोनावरील पुस्तक महत्त्वाचा दस्ताऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:07+5:302021-08-17T04:28:07+5:30
कोल्हापूर : कोरोना कालावधीत जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य विभागाने एकत्रित येऊन कोरोनाचा मुकाबला केला आहे. ...
कोल्हापूर : कोरोना कालावधीत जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, महापालिका व आरोग्य विभागाने एकत्रित येऊन कोरोनाचा मुकाबला केला आहे. त्यावर आधारित असलेल्या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून प्रशासनासाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज निर्माण झाला आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनाने केलेल्या कामाचा लेखाजोखा या कॉफी टेबल बुकमध्ये ठळकपणाने दिसतो आहे, तसेच भविष्यात कोरोनाला कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे याचेही मार्गदर्शन या पुस्तकातून होत असल्याचे सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान, वृषाली पाटील, रोहित कांबळे, सतीश शेडगे, अनिल यमकर, सतीश कोरे, दामू दाते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--
फोटो नं १६०८२०२१-कोल-माहिती कार्यालय
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार चंद्रकांत जाधव, माहिती अधिकारी फारुक बागवान उपस्थित होते.
---