आपटे वाचन मंदिरमध्ये पुस्तक प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:04+5:302021-03-01T04:28:04+5:30

इचलकरंजी : आपटे वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, कविता, अनुवाद आदी साहित्य प्रकारातील नवीन ...

Book exhibition at Apte Vachan Mandir | आपटे वाचन मंदिरमध्ये पुस्तक प्रदर्शन

आपटे वाचन मंदिरमध्ये पुस्तक प्रदर्शन

googlenewsNext

इचलकरंजी : आपटे वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, कविता, अनुवाद आदी साहित्य प्रकारातील नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सरस्वतीपूजन व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, फीत कापून केले.

मीनाक्षी तंगडी यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रेमयोग कवितेचे वाचन केले. ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी ‘मराठी गौरवगीत लाभले आम्हास भाग्य’ याचे वाचन केले. डॉ. कुबेर मगदूम यांनी स्वागत केले.

कार्यक्रमास अशोक केसरकर, काशिनाथ जगदाळे, राजेंद्र घोडके, संजय सातपुते, आदी उपस्थित होते. माया कुलकर्णी यांनी आभार मानले. हे पुस्तक प्रदर्शन ६ मार्चपर्यंत ग्रंथालयीन वेळेत सुरू राहणार आहे.

फोटो ओळी

२८०२२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीतील आपटे वाचन मंदिरात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.

Web Title: Book exhibition at Apte Vachan Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.