तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:41 PM2018-06-25T23:41:03+5:302018-06-25T23:41:31+5:30
तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकतेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकघाबरत बोलून दाखविले. या तिच्यापहिल्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांची प्रतिमा
संजय पारकर ।
राधानगरी : तेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तकतेरा वर्षांच्या गायत्रीचे शाहू महाराजांवर पुस्तक घाबरत बोलून दाखविले. या तिच्यापहिल्या स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला. बक्षीस म्हणून शाहू महाराजांची प्रतिमा मिळाली. घरात नजरेस पडणारी ही प्रतिमाच तिला स्फूर्ती देऊन गेली व आज वयाच्या तेराव्या वर्षी तिने शाहू महाराजांच्या जीवनावरील काही निवडक प्रसंगांवर छानसे पुस्तक लिहिले. या छोट्या लेखिकेचे नाव आहे गायत्री सुरेश शिंदे. ती राधानगरी हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे.
अभ्यासात हुशार असलेली गायत्री आपल्या शंकेचे शिक्षकांकडून निराकरण होईपर्यंत स्वस्थ बसत नाही. चौफेर निरीक्षण करण्याची सवय असल्याने वक्तृत्व कलाही तिला चांगली अवगत झाली आहे. गायत्रीने लिहिलेल्या या पुस्तकाचे शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्याहस्ते प्रकाशन झाले. यावेळी सुरेश शिंदे, एस. बी. बैलकर आर. डी. कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राधानगरी परिसर म्हणजे शाहू महाराजांच्या कार्यकुशलतेचे अनेक ठसे उमटलेला परिसर. दाजीपूरचे शिकारीसाठीचे राखीव जंगल, वारंवार यासाठी महाराजांचे येणे, दऱ्याखोºयातून होणारी त्यांची भटकंती, अस्वलाबरोबर झालेली त्यांची कुस्ती, वाघ व अन्य हिंस्र प्राण्यांची शिकार, या परिसरात महाराजांनी उभारलेले देशातील पहिले धरण, हत्तीमहाल अशा अनेक आठवणी क्षणोक्षणी येथील प्रत्येक नागरिकांना महाराजांची आठवण करून देतात.
वडिलांसोबत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने धरणावर गेलेल्या गायत्रीला यामुळेच महाराजांच्यावर पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. यासाठी वडील सुरेश शिंदे यांनीही तिला प्रोत्साहन दिले.यानंतर तिने महाराजांच्या जीवनावरील पुस्तके वाचायला सुरुवात केली. परिसरातील काही वयोवृद्ध लोकांना भेटून महाराजांविषयी अधिक माहिती मिळवली. यातून मिळालेल्या माहितीतून त्यांच्या जीवनावरील ६६ प्रसंगांवर कथासंग्रह स्वरूपाचे पुस्तक लिहिले. याला प्रासंगिक छायाचित्रांची जोड दिली. त्यामुळे सचित्र स्वरूपाचे हे सुंदर पुस्तक तयार झाले आहे.
यासाठी गायत्रीला शिक्षक एस. बी. बैलकर मुख्याध्यापक आर. डी. कांबळे यांचे मार्गदर्शन व वडील सुरेश शिंदे यांचे प्रोत्साहन मिळाले.