मराठा महासंघाकडून गंगामाई वाचनालयास पुस्तके भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:05+5:302021-03-14T04:23:05+5:30
उपाध्यक्षा गिता पोतदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाचुळकर यांच्याकडे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुस्तके भेट दिली. ...
उपाध्यक्षा गिता पोतदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. बाचुळकर यांच्याकडे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुस्तके भेट दिली. मराठा महासंघाची ओळख निर्माण करण्यात वसंतराव मुळीक यांचा मोलाचा वाटा आहे. मुळीक यांचे धोरण सर्वसमावेशक असेच आहे. मराठा समाजाला संघटित करण्यात व महासंघाला एकसंध ठेवण्यामध्ये वसंतराव मुळीक यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली आहे, असे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त वाचनालयाला पुस्तके भेट देऊन मराठा महासंघाने एक चांगला पायंडा पाडला आहे. त्यांनी राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे, असे डॉ. अशोक बाचुळकर यांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त पुस्तके वाचनालयाला भेट द्या या डाॅ. अशोक बाचुळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा महासंघाचे आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून वाचनालयाला एक हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. यावेळी बंडोपंत कातकर, संभाजी इंजल, प्रकाश देसाई, शिवाजी गुडूळकर, दत्तात्रय मोहिते, शिवाजी पाटील, शंकरराव शिंदे, चंद्रकांत पारपोलकर, महिला आघाडीप्रमुख रचना होलम, गीता नाईक, वाचनालयाचे कार्यवाह विजय राजोपाध्ये, संचालिका डॉ. अंजनी देशपांडे, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडूस्कर यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यवाह सदाशिव मोरे यांनी आभार व सूत्रसंचालन केले.
फोटो कॅप्शन - मराठा महासंघाकडून गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांच्याकडे पुस्तके भेट देताना मारुती मोरे, बंडोपंत कातकर यासह मान्यवर उपस्थित होते.