एसटी कर्मचाऱ्यांना बढतीसाठी पुस्तक बहुमोल ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:40+5:302021-08-13T04:27:40+5:30
कोल्हापूर : एस.टी. महामंडळाच्या खातेअंतर्गत बढती परीक्षेसाठी सुरेश शिंगाडे यांनी लिहिलेले पुस्तक बहुमोल ठरेल, असा विश्वास कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे ...
कोल्हापूर : एस.टी. महामंडळाच्या खातेअंतर्गत बढती परीक्षेसाठी सुरेश शिंगाडे यांनी लिहिलेले पुस्तक बहुमोल ठरेल, असा विश्वास कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख अजय पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयात बुधवारी वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक बढतीसंदर्भात स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे लिखित मार्गदर्शक पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, खात्याअंतर्गत बढतीसाठी अशा पुस्तकाची गरज होती. ती ओळखून शिंगाडे यांनी केवळ एस.टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे पुस्तक तयार केले आहे. ही बाब बढतीसाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक व बहुमोल ठरणारी आहे.
यावेळी सहायक वाहतूक अधीक्षक प्रदीप इंगवले, वाहतूक निरीक्षक राजेंद्र भोसले, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, इंटकचे जिल्हा सचिव अप्पासाहेब साळोखे, एस.टी. कामगार संघटनेचे सचिव वसंत पाटील, दीपक घारगे, मनोज निगवेकर, मधुकर कदम, संजीवनी डोणे, क्रांती कांबळे, छाया मर्दाने आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १२०८२०२१-कोल-एसटी
ओळी : कोल्हापुरातील एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रमुख सुरेश शिंगाडे लिखित खाते अंतर्गत बढती संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन आगार प्रमुख अजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर मंडळी उपस्थित होते.