कोल्हापुरच्या चिमुरड्याने लिहिले पुस्तक; पार्थ देसाईच्या ‘ओराथोस’चे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 09:08 PM2018-10-28T21:08:37+5:302018-10-28T21:09:18+5:30

कोल्हापूर : भरपूर वाचन असल्याशिवाय काही लिहिता येत नाही. पार्थ देसाईसारख्या चिमुरड्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ‘ओराथोस’मुळे इतरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळेल, ...

Book written by Chilurad of Kolhapur; Parth Desai's 'Orathos' release | कोल्हापुरच्या चिमुरड्याने लिहिले पुस्तक; पार्थ देसाईच्या ‘ओराथोस’चे प्रकाशन

कोल्हापुरच्या चिमुरड्याने लिहिले पुस्तक; पार्थ देसाईच्या ‘ओराथोस’चे प्रकाशन

Next

कोल्हापूर : भरपूर वाचन असल्याशिवाय काही लिहिता येत नाही. पार्थ देसाईसारख्या चिमुरड्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ‘ओराथोस’मुळे इतरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळेल, असे मत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले. न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात शाळेचा विद्यार्थी पार्थ देसाई याने लिहिलेल्या ‘ओराथोस ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
शाहू छत्रपती म्हणाले, काही लिहिणे इतके सोपे नसते; त्यासाठी भरपूर वाचन तर पाहिजेच. याशिवाय जन्मजात प्रतिभा व प्रज्ञा असावी लागते. बाललेखक म्हणून आपल्या शाळेचा विद्यार्थी पार्थ देसाई याने लिहिलेले हे पुस्तक निश्चितच इतरांनाही प्रेरणा देणार आहे. यावेळी महाराणी याज्ञसेनीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, शाळेच्या संचालिका राजश्री पाटील, पार्थचे आई- वडील उपस्थित होते.

 

Web Title: Book written by Chilurad of Kolhapur; Parth Desai's 'Orathos' release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.