सीमावासीयांनीही जागविली मराठी अस्मिता

By admin | Published: October 16, 2016 12:18 AM2016-10-16T00:18:00+5:302016-10-16T00:18:00+5:30

कोल्हापूर : गेली चाळीस वर्षे सातत्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय मागणीला सक्रिय

The border people also awakened the Marathi assimata | सीमावासीयांनीही जागविली मराठी अस्मिता

सीमावासीयांनीही जागविली मराठी अस्मिता

Next

पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या करवीरकरांच्या हाकेला प्रतिसाद देत शनिवारी निघालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला सीमाभागातील सुमारे पन्नास हजार मराठा बांधवांनी उपस्थिती लावून मराठी अस्मितेची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. कर्नाटकातील मराठा समाजालाही आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी सीमाभागातील मराठा बांधवांनी यानिमित्ताने केली.
बेळगावच्या महापौर सरिता विराज पाटील, उपमहापौर संजय शिंदे, आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नगरसेविका रेणू मुतगेकर, सुधा भातखंडे, विजय भोसले, विनायक गुंजटकर, गटनेते पंढरी परब, किरण सायनाक, किरण गावडे, नूतन गायकवाड, प्रकाश मिरगाळे, अमीन देसाई, डॉ. विराज पाटील, मंगेश देसाई, गायत्री देसाई, आदींनी सीमाभागातील मोर्चेकऱ्यांचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे महापौर सरिता पाटील या शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात येऊन दाखल झाल्या होत्या. त्यांचे स्वागत महापौर अश्विनी रामाणे यांनी केले. बेळगाव महापालिका हद्दीत एकूण ५८ प्रभाग असून, त्यापैकी ३२ प्रभागांत मराठी गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत. ३२ प्रभागांतील नगरसेवकांनी
चार-चार बसेसमधून त्यांचे कार्यकर्ते आले होते. त्याशिवाय बेळगाव ग्रामीणमधूनही असंख्य कार्यकर्ते आले होते. सीमाभागातून आलेल्या सर्व मराठी बांधवांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संभाजीनगर एनसीसी आॅफिसजवळ करण्यात आली होती, तर श्री छत्रपती संभाजीनगर
तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या चहा व नाष्ट्याची सोय केली
होती.
सवलतींची मलमपट्टी नको
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाला शैक्षणिक सवलती जाहीर केल्या आहेत. फडणवीस यांनी अशा सवलती जाहीर करून मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका महापौर सरिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. आम्हाला सवलती नको आहेत. सरकारी नोकरीत आणि शिक्षणक्षेत्रात आरक्षण पाहिजे आहे. नुसतीच मलमपट्टी नको. आमच्या मराठा शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कोपर्डीतील अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्या घटनेचा मी निषेध करते. महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

 

Web Title: The border people also awakened the Marathi assimata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.