सीमाप्रश्नी कोल्हापुरात आज बैठक
By admin | Published: January 25, 2016 01:08 AM2016-01-25T01:08:12+5:302016-01-25T01:08:23+5:30
प्रथमच तज्ज्ञ समिती
कोल्हापूर : राज्य सरकारने सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांची नेमणूक केल्यानंतर प्रथमच तज्ज्ञ समिती आणि समन्वयक मंत्र्यांची एकत्रित बैठक आज, सोमवारी सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर होत आहे. या बैठकीस ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सीमालढ्याबाबत भविष्यातील कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात सादर होणाऱ्या साक्षीपुराव्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून सीमालढा सुरू आहे. तो आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या न्यायालयात सक्षम साक्षी आणि पुरावे सादर करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. हा सीमाप्रश्न अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन अशी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह तज्ज्ञ समितीचे सदस्य आणि समन्वयक मंत्री (पान १० वर)