दोघे भाऊ नौसेनेत भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:25+5:302021-04-19T04:21:25+5:30
कोणतीही शैक्षणिक, राजकीय, सैनिकी पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ओंकार संजय पाटील व अंकित संजय पाटील या दोघा सख्ख्या ...
कोणतीही शैक्षणिक, राजकीय, सैनिकी पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील ओंकार संजय पाटील व अंकित संजय पाटील या दोघा सख्ख्या भावांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेत पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौसेनेत भरती होऊन बाजी मारली आहे. त्यातील ओंकार हा मोठा असून त्याने बारावीनंतर तर अंकित याने दहावीनंतर असणाऱ्या भारतीय नौसेनेच्या परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली होती. दोघांनीही स्वतःचे लक्ष स्वतः निवडले असल्यामुळे स्वतःलाच नियोजनपूर्वक अभ्यासाबरोबरच शारीरिक क्षमता चाचणीसाठी व्यायामाकडे ही भर देत सराव करत होते. फेब्रुवारी २०२० मध्ये या दोघांनीही पुणे येथे लेखी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर दुसऱ्याच महिन्यात लॉकडाऊन झाल्यामुळे निकाल वर्षभर पुढे ढकलला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये ओंकारचा निकाल लागला. त्यानंतर तो फिजिकल व मेडिकल परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने भारतीय नौदलात त्याला ट्रेनिंगसाठी पत्र आले. ओंकारला भरती होऊन दीड महिना पूर्ण होण्याअगोदरच अंकीतचाही निकाल लागला. तोही फिजिकल व मेडिकलमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन भरतीय नौसेनेत दाखल झाला.