मंगळवारच्या ‘भारत बंद’ ला शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसनी पाठिंबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:02 AM2020-12-05T05:02:54+5:302020-12-05T05:02:54+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ...

Both the Congress and Shiv Sena should support Tuesday's 'Bharat Bandh' | मंगळवारच्या ‘भारत बंद’ ला शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसनी पाठिंबा द्यावा

मंगळवारच्या ‘भारत बंद’ ला शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेसनी पाठिंबा द्यावा

Next

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या व शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी (दि. ८) ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला. या बंदला महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

देशातील ५०० हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून ‘भारत बंद’च्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्यासाठी किसान सभेने प्रयत्न सुरू केले आहेत.

महाराष्ट्रातील भाजप सोडून उर्वरित सर्वच राजकीय पक्षांनी बंदच्या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ ठेवून शेतकऱ्यांना समर्थन द्यावे व बंद यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे आंदोलनात उतरावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Web Title: Both the Congress and Shiv Sena should support Tuesday's 'Bharat Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.