ठरलं! कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा शिंदे गटाला
By समीर देशपांडे | Published: January 15, 2024 11:46 AM2024-01-15T11:46:52+5:302024-01-15T11:47:43+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री हसन ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही माहिती दिली. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतिक्षा आहे. त्यातही हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याने कोल्हापूरच्या आघाडीच्या उमेदवाराची प्रतिक्षा आहे.
गेले काही महिने उमेदवारांबाबत उत्सुकता होती. परंतू महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रीफ यांनी या दोन्ही जागांवर शिंदे गटाचे खासदार असल्याने त्यांनाच या दोन्ही जागा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने पुन्हा रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हातकणंगलेमधून पुन्हा एकवार माने आणि राजू शेट्टी यांच्यात लढत रंगणार असून मंडलिक यांच्याविरोधात कोण हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.