दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:10 PM2024-09-03T13:10:57+5:302024-09-03T13:14:01+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी पश्चिम महाराष्ट्रात घडामोडींना वेग आला असून, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

Both Patals met, who will Sharad Pawar give the ticket from 'Radhanagari'? | दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

Radhanagari Vidhan Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः विधानसभेची तयारी करत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते 'तुतारी'च्या चिन्हावर लढण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशात राधानगरी विधानसभा मतदारसंघातील एकमेकांचे दाजी-मेहुण असलेल्या दोन नेत्यांनी पवारांची भेट घेतली. आता पवार कुणाला उमेदवारी देणार, याची चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.  

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. शरद पवार राज्यातील विविध भागाचे दौरे करत आहे. या दौऱ्यांमध्ये विधानसभा लढवण्यास इच्छुक नेते शरद पवारांच्या भेटी घेताना दिसत आहे. 

शरद पवारांची मुश्रीफांविरोधात रणनीती

अजित पवारांच्या फुटीनंतर पक्षाला मोठे भगदाड पडले. अनेक विद्यमान आमदार आणि मोठे नेते अजित पवारांसोबत गेल्यानंतर शरद पवार पक्षसंघटना मजबूत करताना दिसत आहे. कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफही अजित पवारांसोबत गेल्यानंतर शरद पवारांनी आता भाजपचे समरजीतसिंह घाटगे यांच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात हालचाली 

अशातच राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले आणि अजित पवारांना राम राम केलेले माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे स्वतंत्रपणे शरद पवारांना भेटले. कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये ही भेट झाली. के.पी. पाटील हे ए.वाय. पाटलांचे मेहुणे आहेत. पण, दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. 

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीकडून लागला. आता महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची कमी शक्यता असल्याने के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे शरद पवारांच्या तुतारीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. 

ए.वाय. पाटलांना संधी मिळणार की, के.पी. पाटील लढणार?

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ए.वाय. पाटील असे म्हणाले की, "दहा वर्षांपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. शरद पवारांनी मला दोन वेळा थांबायला सांगितले. शब्दाला मान देऊन निवडणूक लढवली नाही. पण, आता शरद पवारांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवणार, ते मला उमेदवारी देतील."


एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ जागावाटपात पुन्हा शिवसेनेकडे जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडली. आता मविआकडून दोघे उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, पण शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे. 

Web Title: Both Patals met, who will Sharad Pawar give the ticket from 'Radhanagari'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.