सीपीआरमधील म्युकरचे दोन्ही वॉर्ड फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:36+5:302021-05-28T04:19:36+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरचे ७० रुग्ण आढळले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला ...

Both wards of Mucker in CPR are full | सीपीआरमधील म्युकरचे दोन्ही वॉर्ड फुल्ल

सीपीआरमधील म्युकरचे दोन्ही वॉर्ड फुल्ल

Next

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरचे ७० रुग्ण आढळले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ५५ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ३६ जण सीपीआरमध्ये उपचार घेत असून उर्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

आतापर्यंत सीपीआरमधील १० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन सुरू आहे. सीपीआरवरील ताण लक्षात घेता शासनाने कोल्हापूर शहरातील चार, तर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात महात्मा फुले योजनेतून उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील अपल, डी.वाय. पाटील, डायमंड, सिध्दगिरी येथे उपचारास परवानगी देण्यात अली आहे.

Web Title: Both wards of Mucker in CPR are full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.