महागाई कमी करण्यासाठी शासनाला दंडवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 02:09 PM2021-07-16T14:09:15+5:302021-07-16T14:11:08+5:30

Labour collector Office Kolhapur: पेट्रोल, डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

Bowing to the government to reduce inflation | महागाई कमी करण्यासाठी शासनाला दंडवत

कोल्हापुरातील अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्यावतीने शुक्रवारी महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग यावी यासाठी दंडवत घालत येत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Next
ठळक मुद्देमहागाई कमी करण्यासाठी शासनाला दंडवत महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेलची दरवाढ, घरगुती गॅस, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना झोपेचं सोंग घेणाऱ्या केंद्र सरकारला व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार-कर्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांनी साष्टांग दंडवत घालत येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

कोरोनामुळे गेल्या दीडवर्षांपासून कमाई नाही, नोकरी, व्यवसाय उद्योग बंद असताना सर्व प्रकारच्या महागाईने उच्चांक गाठला आहे, ऑफलाईन शिक्षण बंद होवून ऑनलाईन शिक्षण सुरू असताना आपल्या मुलांना स्मार्ट फोन देता येत नसल्याने अनेकजणांनी आत्महत्या केली.

कष्टकरी पालकांना आपल्या मुलांचे शैक्षणिक आयुष्य संपले की काय अशी भीती वाटत आहे. एखादी इच्छा पूर्ण व्हावी किंवा त्रास कमी व्हावा यासाठी परंपरा म्हणून देवाला दंडवत घातले जाते, महागाईला कंटाळलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्यावतीने सरकारला जाग आणण्यासाठी साष्टांग दंडवत घालून महागाई कमी करण्यासाठी साकडे घालत आहोत.

कष्टकरी वर्गाला उपाशी मारण्यापेक्षा आत्महत्या करुन मरण्याची वेळ येवू देवू नये म्हणून महागाई तात्काळ कमी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत कोकाटे, जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, समाधान बनसोडे, फरजाना नदाफ, शबाना मुजावर, अर्जून वाघमारे विजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Bowing to the government to reduce inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.