हायपर टेन्शन असलेल्या व्यक्तींना बीपी कार्ड, महापालिकेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:08+5:302021-08-12T04:27:08+5:30
शहरात अनेक व्यक्तींना हायपर टेन्शनचा त्रास असतो, परंतु त्यांना रक्तदाब आहे की नाही याची तपासणी केली जात नाही. केवळ ...
शहरात अनेक व्यक्तींना हायपर टेन्शनचा त्रास असतो, परंतु त्यांना रक्तदाब आहे की नाही याची तपासणी केली जात नाही. केवळ हायपर टेन्शनवरच उपचार सुरू असतात. त्यामुळे अशा व्यक्ती जेव्हा महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच रुग्णालयात तपासणीसाठी येतील त्यावेळी त्यांचा रक्तदाब तपासला जाईल. हायपर टेन्शन असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रक्तदाब वाढलेला असेल तर त्याची नोंद ठेवून त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. काही दिवस त्याच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.
रक्तदाब नियंत्रणात राहिला तर ठीक परंतु वारंवार त्याचा त्रास सुरुच राहिला तर त्या व्यक्तीला औषधोपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. हा उपक्रम राबविण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सकरीता प्रशिक्षणही देण्यात आले आहे. कशा पद्धतीने रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारपासून या उपक्रमाची सुरुवात झाली, एका व्यक्तीला बीपी कार्ड देण्यात आले.