‘ब्राह्मीण काईट’ला मुलांच्यामुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:02 PM2017-12-05T22:02:23+5:302017-12-06T01:02:39+5:30
कोल्हापूर : शहरातील मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील एका झाडावर पतंगाच्या मांजा दौºयात पंख अडकून 'ब्राम्हीण काईट' या जातीचा पक्षी जखमी झाला.
कोल्हापूर : शहरातील मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील एका झाडावर पतंगाच्या मांजात पंख अडकून 'ब्राम्हीण काईट' या जातीचा पक्षी जखमी झाला. त्याची चार पिसे तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.
क्रिडांगणावर खेळणाºया प्रसाद कांबळे, शिवा खाकी, सुजल कांबळे, साहील शेख, रोहन राठोड या मुलांना दुपारी ही घटना दिसली. त्यांनी चिल्लर पार्टीचे मिलींद पाटील यांना या जखमी पक्ष्याची माहिती दिली. तेव्हा त्यांनीही अग्निशमन दलाच्या पथकाला याची माहिती दिली. उंच झाडावर अडकल्याने व सुटकेसाठी अधिक धडपड केल्याने ब्राम्हिन काईट जखमी झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक तत्काळ दाखल झाले. त्यांनी अथक परिश्रमाने 'ब्राम्हिण काईट' ची सुटका करून अधिक उपचारासाठी मंगळवार पेठ येथील पशु चिकित्सालयमध्ये दाखल केले.
यासाठी मुख्याध्यापक प्रवीण काटकर, किरण पाटील यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला सहकार्य केले.
पतंग उडविण्याच्या प्रयत्नात आजही मांज्यात अडकून नाहक छोट्या मोठ्या पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. पतंग उडविणाºया हौशी कलाकारांनी या खेळात पक्षी जखमी होणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्यातूनही एकादा पक्षी जखमी झाल्यास तातडीने त्याला उपचारासाठी मदत करणे किंवा पक्षीमित्र यांना कळवून त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे चिल्लर पार्टी संस्थेचे मिलींद पाटील यांनी सांगितले. आज या 'ब्राम्हीण काईट' पक्ष्यालाही केवळ या मुलांमुळेच जीवदान देणे शक्य झाल्याचे पाटील म्हणाले.