ब्रह्मचैतन्य महाराज जयंती उत्सव साधेपणाने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:09+5:302021-02-15T04:21:09+5:30
कोल्हापूर : कपिलतीर्थ येथील पूर्णब्रह्म सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पादुका मंदिरातील उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती सांप्रदायिक ...
कोल्हापूर : कपिलतीर्थ येथील पूर्णब्रह्म सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पादुका मंदिरातील उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती सांप्रदायिक बाबूराव ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोरोनामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला असून, महाप्रसाद रद्द केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कपिलतीर्थ मार्केट येथे गं.भा. गंगुबाई रेंदाळकर यांनी १९२० साली स्थापन केलेल्या सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज पादुका मंदिरामध्ये प्रतिवर्षी माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंतपंचमीपासून माघ शुद्ध द्वादशीपर्यंत महाराजांचा जयंती उत्सव साजरा होतो. उद्या, मंगळवारी वसंतपंचमी असून बुधवारी (दि. २४) महाराजांची जयंती आहे. त्यामुळे या वर्षी नऊ दिवस उत्सव असणार आहे. गतवर्षी पादुका स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला होता. यंदा मात्र, कोरोनामुळे तो साधेपणाने साजरा होणार आहे.