ब्रह्मचारी यशपाल जैन यांचे संयमपूर्वक निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:23 AM2021-03-06T04:23:35+5:302021-03-06T04:23:35+5:30

यशपाल जैन हे भारतातील वरिष्ठ जैन विद्वान होते. त्यांच्या निधनाने जैन अध्यात्मिक प्रवचनकार व जैन गणिताचे गाढे अभ्यासकांची ...

Brahmachari Yashpal Jain passed away with restraint | ब्रह्मचारी यशपाल जैन यांचे संयमपूर्वक निधन

ब्रह्मचारी यशपाल जैन यांचे संयमपूर्वक निधन

Next

यशपाल जैन हे भारतातील वरिष्ठ जैन विद्वान होते. त्यांच्या निधनाने जैन अध्यात्मिक प्रवचनकार व जैन गणिताचे गाढे अभ्यासकांची पोकळी निर्माण झाली आहे.

ब्रह्मचारी यशपाल जैन मुळचे सांगली जिल्ह्यातील नांद्रे या गावाचे. १९६० ते १९७४ पर्यंत त्यांनी बाहुबलीमध्ये राहून जैन धर्माचे अध्ययन केले. त्यानंतर वेरूळ येथील जैन गुरुकुल येथे संचालक म्हणून काम पाहिले.१९७८ ते २०१८ पर्यंत ते जयपूर (राजस्थान) येथील पंडित टोडरमल स्मारक येथे भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्वान घडविण्याचे काम त्यांनी केले आहे सध्या प्रकृती अस्वथ्यामुळे हेरेले येथे राहण्यासाठी आले होते.

त्यांनी गुणस्थान विवेचन सारख्या अनेक पुस्तकांचे लेखन करून जैन तत्वज्ञानातील अनेक पैलू उघड केले आहेत. जैन गणित विषयावर लेखन आणि अध्यापन केले आहे. अध्यात्माचा सूक्ष्म पकड त्यांना होती.

फोटो-

ब्रह्मचारी यशपाल जैन

Web Title: Brahmachari Yashpal Jain passed away with restraint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.