वारणा बँकेची पिंपरी चिंचवडमध्ये शाखा

By admin | Published: July 31, 2016 12:18 AM2016-07-31T00:18:46+5:302016-07-31T00:18:46+5:30

३८ वी शाखा : सामाजिक, आर्थिक सुरक्षा देऊ - विनय कोरे

Branch of Waranka Bank in Pimpri Chinchwad | वारणा बँकेची पिंपरी चिंचवडमध्ये शाखा

वारणा बँकेची पिंपरी चिंचवडमध्ये शाखा

Next

 कोल्हापूर : पिंपरी-चिंचवड या ठिकाणी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून आलेल्या रहिवाशांसाठी आणि पुण्यातील उद्योजकांसाठी आपल्या ३८ व्या शाखेच्या माध्यमातून आर्थिक सेवेचे दालन अर्पण करीत आहोत. आपल्या गावाकडचं काहीना काही माझ्या शहरात येत आहे, त्याचे आपण स्वागत करून त्याच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे, असे आवाहन वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनयरावजी कोरे यांनी केले. ते वारणा सहकारी बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या उद्घाटन सोहळ््याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पुणे शहरात वारणा परिसरातील अनेकजण नोकरी, शिक्षण, उद्योगाच्या निमित्ताने आले आहेत. पुण्यातील बदलत चाललेली परिस्थिती पाहता कुटुंबीयांची सामाजिक सुरक्षितता जपायची असेल तर आपली एक वेगळी वसाहत निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत कोरे यांनी मांडले.
बँकेच्या गुलटेकडी, पुणे व कर्वे रोड, पुणे शाखांना पुणेवासीय चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले. चिंचवडवासीय या नवीन शाखेस प्रचंड प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा निपुणराव कोरे यांनी व्यक्त केले.
यावेळी वारणा परिसरातून आणि पुण्यात स्थायिक झालेल्या रहिवाशांमधील दहावी, बारावीत विशेष गुण मिळविणाऱ्या अश्विनी पाटील, मोहन पाटील, मानसी पाटील, आकाश साळोखे, जनार्दन गायकवाड, तुषार गुरव या गुणवंत मुलांचा सत्कार विनयरावजी कोरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी उपाध्यक्ष उत्तम पाटील, ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, सर्जेराव पाटील, उद्योजक सुनील पेशवानी, राजाभाऊ गोलांडे, विठ्ठलराव रसाळ, माणिकलाल कांकरिया, समित कदम, संदीप पाटील, सी.ई.ओ. विकास लंगरे, आदी उपस्थित होते.
ंंंंवारणा सिटी
‘वारणा सिटी’ या संकल्पनेतून ३००० फ्लॅटस्ची योजना कार्यान्वित झाल्यास एक शक्ती आणि मानसिक आधार मिळेल, असे सांगून लवकरच या अनुषंगाने तज्ज्ञ व्यक्तीसह एक वेगळा मेळावा आयोजित केला जाईल, असे कोरे यांनी नमूद केले.

Web Title: Branch of Waranka Bank in Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.