शिक्षक बॅँकेतील एकाधिकारशाही मोडून काढा : एस. व्ही. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:48+5:302021-02-10T04:22:48+5:30

कोल्हापूर : मनमानी कारभारामुळे शिक्षक बँकेच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बँकेतील एकाधिकारशाही मोडून काढत शिक्षकांचे मातृसंस्थेचे अस्तित्व अबाधित ...

Break the monopoly in teacher bank: S. V. Patil | शिक्षक बॅँकेतील एकाधिकारशाही मोडून काढा : एस. व्ही. पाटील

शिक्षक बॅँकेतील एकाधिकारशाही मोडून काढा : एस. व्ही. पाटील

Next

कोल्हापूर : मनमानी कारभारामुळे शिक्षक बँकेच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बँकेतील एकाधिकारशाही मोडून काढत शिक्षकांचे मातृसंस्थेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सभासदांनी सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख एस. व्ही. पाटील यांनी केले. जिल्ह्यात शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाची अभेद्य फळी उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, संघाचे दिवंगत नेते पी. सी. पाटील यांनी सहकारात काम करण्यासाठी दिलेल्या मूलमंत्रानुसार बँकेत काम करू. संभाजीराव थोरात यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने शिक्षक तणावमुक्त काम करीत आहेत.

संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील म्हणाले, शिक्षक बॅँक ही आपली मालमत्ता असल्यासारखे सत्ताधारी वागत आहेत. नोकरभरतीस सर्वसाधारण सभेत सभासदांनी विरोध करून अनादर करीत भरती केली. अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी सभासदांनी पाठीशी रहावे. रघुनाथ खोत, सुनील पाटील, सुरेश कांबळे, लक्ष्मी पाटील, दुंडेश खामकर, पुष्पाताई वाघराळकर यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष नंदकुमार वाईंगडे यांनी स्वागत केले. मधुकर येसणे यांनी प्रास्ताविक केले. विनायक पवार, अनिल बागडी, विठ्ठल कदम, संदीप कदम, बाळासाहेब वालीकर, आनंदा पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे प्राथमिक शिक्षक संघाच्या मेळाव्यात एस. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो-०९०२२०२१-कोल-गडहिंग्लज)

Web Title: Break the monopoly in teacher bank: S. V. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.