दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन : राणे

By admin | Published: December 29, 2014 11:00 PM2014-12-29T23:00:22+5:302014-12-29T23:36:15+5:30

प्रशासनाला इशारा : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा विरोधच

Break the wall in ten days, otherwise I will paden: Rane | दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन : राणे

दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन : राणे

Next

सावंतवाडी : आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा विरोध डावलून कोण काम करीत असेल तर शांत राहू नका, असे कार्यकर्त्यांना सुनावत येत्या दहा दिवसांत जेटीची भिंत प्रशासनाने न काढल्यास मी स्वत: ती भिंत हटविण्यासाठी आरोंदा येथे जाईन. पुढची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँॅग्रेस नेते नारायण राणे यांनी दिला आहे. सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू मसूरकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, राज्यमंत्र्याला किती अधिकार असतात हे त्यांनी अगोदर पाहावे. राज्यमंत्री अधिकाऱ्यालाही आदेश देऊ शकत नाही. मात्र, आताचे पालकमंत्री गटविकास अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि जेवणावळी वाढतात. या जेवणावळीचा खर्च तसेच हारतुऱ्यांचा खर्च हा ठेकेदाराच्या खिशातून होत असून याची चौकशी झाली पाहिजे. या सर्व ठेकेदारांची यादी माझ्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोंदा जेटीवरून आमच्या माणसांवर कोणी कितीही गुन्हे दाखल करू दे अगर धमक्या देऊ दे, आरोंदावासीयांच्या मागे मी ठामपणे उभा आहे. काम करणारे किती दिवस पोलीस संरक्षण घेतात, हेच पाहायचे आहे, असे सांगत दोन टक्क्यांवर दलाली करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा सवालही राणे यांनी केला. (प्रतिनिधी)


देसाई यांच्यावर टीका
नारायण राणे यांनी यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही जोरदार टीका केली. मी या जिल्ह्यातीलच आहे. उपरा नाही, त्यामुळे मी मालकच असून, पालकमंत्र्यांनी हे उपऱ्यांना सांगावे, मला नाही. देसाई यांनी प्रथम उद्योग विभागाचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे. विमानतळ करतानाच रस्ते करायचे का, असे विचारणाऱ्यांचे किती हे अज्ञान, असे सांगत पुन्हा माझ्यावर टीका केल्यास उसन्या दाताच्या कवळ्या माघारी जाणार नाहीत, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Web Title: Break the wall in ten days, otherwise I will paden: Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.