सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:50+5:302021-04-26T04:21:50+5:30

दोन वर्षांपूर्वी धरणाच्या दुरुस्तीवर ४० लाखांचा खर्च लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यातील सात व पन्हाळा ...

Breaking the pillars of Sangrul dam | सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड

सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड

Next

दोन वर्षांपूर्वी धरणाच्या दुरुस्तीवर ४० लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : करवीर तालुक्यातील सात व पन्हाळा तालुक्‍यातील ४ गावांसाठी वरदान ठरलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सांगरूळ बंधाऱ्याच्या पिलरना भगदाड पडले असून येत्या पावसाळ्यात बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दोनच वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या मजबुतीकरण व दुरुस्ती वर ४० ते ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला असून पिलरच्या पद्धतीने तो पाण्यात गेल्याची समोर आले आहे.

करवीर तालुक्याच्या पश्चिमेला आशिया खंडातील पहिली सहकारी तत्त्वावरील सांगरूळ बंधारा १९४९ मध्ये उभारण्यात आला होता. सांगरूळ कुडित्रे दरम्यान कुंभी नदीवरील या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याने करवीर तालुक्यातील सांगरूळ, कोपार्डे, आडूर,कळंबे, भामटे, चिंचवडे तर पन्हाळा तालुक्यातील मरळी,मोरेवाडी, मल्हारपेठ,सावर्डे अशा ११ गावांना वरदान ठरले होते.

पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या बंधाऱ्याच्या पिलरला असलेले दगड मोठ्या प्रमाणात निखळू लागले होते. धरण संस्थेचे उत्पन्न व बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च यात ताळमेळ बसेना. चंद्रदीप नरके यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून बंधाऱ्याच्या मजबुतीकरणासाठी २० लाख ७२ हजार रुपये मंजूर करून आणले.

या निधीत धरण संस्थेने आपल्या उत्पन्नातून २० लाख रुपये रक्कम घालून दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी निविदा काढली होती. मात्र बंधाऱ्यातील बर्गे घालण्याच्या गाळ्याचेच काम करण्यात आले. पिलरला ठिकाणी आलेल्या कुमकुवतपणाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे अवघ्या दोन वर्षांपूर्वी ४० ते ४५ लाख रुपये खर्च करूनही बंधाऱ्याच्या ७,८ व ९ नंबरच्या पिलरचे दगड मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. एका पिलरचे दगड तर आरपार ढासळल्याने पावसाळ्यात बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेमका येथे पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो. अशावेळी हे आरपार दगड निखळलेले पिलर टिकणार का असा सवाल उपस्थित होत आहे

फोटो

कुंभी नदीवर असलेल्या सांगरूळ बंधाऱ्याचे पिलरचे निखळून पडलेले दगड तर गाळ्याचे काम निकृष्ट झाल्याने लाकडी बरगे खाली-वर बसवले आहेत.

(फोटो प्रकाश पाटील)

Web Title: Breaking the pillars of Sangrul dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.