एस.टी.चा ब्रेक निकामी; अन् सतर्कतेने अनर्थ टळला

By admin | Published: May 28, 2017 12:56 AM2017-05-28T00:56:52+5:302017-05-28T00:56:52+5:30

सुदैवाने रहदारी कमी

Breaks of ST; And cautiously avoid disaster | एस.टी.चा ब्रेक निकामी; अन् सतर्कतेने अनर्थ टळला

एस.टी.चा ब्रेक निकामी; अन् सतर्कतेने अनर्थ टळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील रंकाळा चौपाटीसमोर एस. टी. बसचा ब्रेक शनिवारी रात्री निकामी झाल्याने गोंधळ उडाला. नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून बसच्या चाकाखाली दगड, विटा टाकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. एस.टी.बसचा हा प्रकार समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; पण यामध्ये कोणीही जखमी न झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बोलोली-रंकाळा एस.टी.बस ही रंकाळा चौपाटीजवळील रस्त्यावर आली असता तिचे अचानक ब्रेक निकामी झाले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने बसमधील प्रवाशांना सावध केले. त्यानंतर प्रवासी व चालकांनी समोरील वाहनधारक व नागरिकांना आरडाओरडा करून बाजूला होण्यास सांगितले. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या घटनेने नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून बसच्या चाकाखाली दगड, सिमेंटच्या विटा टाकून बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातील सिमेंटची वीट चाकाखाली अडकून बसल्याने अखेर ही बस जाग्यावर थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


सुदैवाने रहदारी कमी
आता सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे गर्दी असते. याचबरोबर हा रस्ता कोकणला जोडल्यामुळे दिवस-रात्र या रस्त्यावरून वाहनांची ये-जा असते. या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असते; पण सुदैवाने शनिवारी रात्री रहदारी कमी होती.

Web Title: Breaks of ST; And cautiously avoid disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.