स्तनाचा कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:22 PM2019-04-24T23:22:53+5:302019-04-24T23:22:57+5:30

डॉ. भारती अभ्यंकर नेहा चाळीस वर्षीय गृहिणी. हसतमुख, उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेली. एक दिवस धावत पळत कन्सल्टिंगमध्ये आली. मैत्रिणींसोबत तिची ...

Breast cancer | स्तनाचा कॅन्सर

स्तनाचा कॅन्सर

Next

डॉ. भारती अभ्यंकर
नेहा चाळीस वर्षीय गृहिणी. हसतमुख, उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेली. एक दिवस धावत पळत कन्सल्टिंगमध्ये आली. मैत्रिणींसोबत तिची काही तक्रार सांगायला आली होती. जाता जाता सहज म्हणाली, मॅडम, मी पण एकदा येणार आहे हो चेकिंगला; पण वेळच मिळत नाहीय ! मग, मी तिला चाळिशी दरम्यान काय चेकिंग किंवा तपासणी केली पाहिजे हे सांगताच म्हणाली, उद्याच ‘हाफ डे’ काढून नक्की येते! अशातच दोन महिने निघून गेले आणि एक दिवस नेहा प्रगटली. प्राथमिक चौकशीत तिला काहीच त्रास नव्हता. तिची कसलीच तक्रार नव्हती. माझ्या सल्ल्यावरून स्वत:चे चेकिंग करण्यासाठी ती आली होती. साहजिकच मी तिची पूर्ण तपासणी करू लागले तेव्हा स्तनाची तपासणी करताना माझे हात थबक लेच. अग नेहा, छातीत थोडी गाठ जाणवतेय गं. तुझ्या कधी लक्षात आली नाही का? असे म्हणताच म्हणाली, अहो मॅडम, झाले दोन-तीन महिने, पण त्याचा मला काहीच त्रास नाही हो! ती गाठ अजिबात दुखत नाही. थोडी मोठी झालीय; पण ङ्म३ँी१६्र२ी, ल्लङ्म स्र१ङ्मु’ीे ाङ्म१ ेी! गाठ तपासताच माझ्या मनाने निदान केलं की, ती गाठ कॅन्सरची वाटतेय आणि खरोखरंच तपासणीअंती त्याचं निदान कॅन्सर असंच झालं!
असा हा स्तनाचा कॅन्सर ! सध्या क्रमवारीत त्यानं अव्वल स्थान पटकावलंय. कॅन्सरमुळे जे मृत्यू होतात त्यातही याचा दुसरा नंबर आहे; पण एक गोष्ट आहे की, यामुळे होणाऱ्या एकंदर मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होतेय! नवीन शोध, योग्य उपाय आणि वेळेवर निदान हे यासाठी कारणीभूत ठरतात.
स्तन प्रामुख्याने पुढील गोष्टींनी बनलेले असते :
१) दूध तयार करणाºया ग्रंथी (छङ्मु४’ी२)
२) दूध वाहून नेणाºया नलिका (ऊ४ू३२)
३) या दोन्हीमधे असणारे अन्य घटक - चरबी, रक्तवाहिन्या, वगैरे.
यापैकी दूध वाहून नेणाºया नलिकेमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळते (४िू३ं’ ूंल्लूी१). काही कॅन्सर ग्रंथीमध्ये होतात (ङ्मु४’ं१ ूंल्लूी१) आणि काही कॅन्सर बाकी घटकांमध्ये आढळतात.
हा कॅन्सर कशामुळे होतो? याचे नक्की कारण अद्याप समजलेले नाही. बहुतेक वेळा गुणसूत्रांमधील बदल याला कारणीभूत असतात. हे बदल बºयाच वेळा अनुवंशिक असतात; परंतु काही वेळा हे बदल नंतर होत असतात. (ॅील्ली३्रू े४३ं३्रङ्मल्ल२) मधील बदल आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. वयानुरूप हे बदल घडतात व त्याचे पर्यवसान कॅन्सरमध्ये होते. हा कॅन्सर कोणाला होऊ शकतो ?
४ महिलांमध्ये हा कॅन्सर जास्त प्रमाणात आहे; परंतु पुरुषांना पण हा होऊ शकतो. ४ वय वाढेल तसे हा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते. अर्थात तरुण स्त्रियांमध्ये सुद्धा हा आढळतो. ४ जवळजवळ ५ ते १० टक्के कॅन्सर हे गुणसूत्रातील े४३ं३्रङ्मल्ल२ मुळे होतात. उदा. ु१ूं्र ंल्ल िु१ूं मधील बदल. ४ ज्या स्त्रियांचे जवळचे नातेवाईक म्हणजे आई, बहीण, मुलगी यापैकी एका जरी नातेवाइकात हा कॅन्सर असेल, तर तिला ूंल्लूी१ होण्याचे प्रमाण दुप्पट असते आणि यापैकी दोन नातेवाइकांना हा कॅन्सर असेल तर त्या स्त्रिला हा कॅन्सर होण्याचे प्रमाण तिप्पट असते. ४ घरातील भाऊ किंवा वडिलांना कॅन्सर झाला असेल तरी त्या स्त्रिया ँ्रॅँ१्र२‘ मध्ये मोडतात. ४ ज्या स्त्रियांच्या एका स्तनामध्ये कॅन्सर झाला आहे, त्यांच्या दुसºया स्तनात कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते. ४ ज्या स्त्रियांना स्तनाचे अन्य आजार आहेत, त्यांना याचा धोका जास्त असतो. ४लहानपणी ज्यांना १ं्िरं’ल्ल दिले गेले आहे (अन्य आजारांसाठी), त्यांना याचा धोका वाढतो. ४ ज्या स्त्रिया रजोनिवृत्ती दरम्यान संप्रेरकांचा (ँ१३) वापर करतात, त्यांना हा धोका वाढतो. ४ गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंजेक्शन अनिर्बंधपणे वापरणे म्हणजे या कॅन्सरला आमंत्रण देण्यासारखे आहे. ४ ज्या स्त्रियांमध्ये वंध्यत्व आहे किंवा ज्यांना पहिले अपत्य तिशीनंतर झालेले आहे, त्यांच्यामध्ये याचे प्रमाण जास्त दिसते. ४ ज्यांच्यामध्ये शरीराची हालचाल कमी आहे, ज्या स्त्रिया स्थूल आहेत, त्यांच्यामध्ये याचा धोका जास्त असतो. ४ ज्या स्त्रियांमध्ये दारूपिण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यांना या कॅन्सरला सामोरे जावे लागते.
वरील सर्व बाबींचा विचार करून आपण या १्र२‘ ूं३ँी१८ मध्ये आहोत का? याचा विचार करून सजग राहणे गरजेचे असते. या आजाराचे निदान लवकर झाले तर निश्चितच त्याचे परिणाम चांगले मिळतात. यासाठी काही २ू१ीील्ल्रल्लॅ पद्धती आहेत.
४ स्वत:च स्वत:चे स्तन तपासणे. - मासिक पाळी नंतरच्या कालावधीत ही तपासणी करावी. यामध्ये स्तनातील बदल, रंगातील गहिरेपणा, आकारात वाढ होणे, निपल्समधून काही स्राव येतो का, हे पाहणे. ४ क्लिनिकल स्तन तपासणी - वयाच्या पस्तिशीनंतर डॉ.कडून दरवर्षी स्तनतपासणी (ू’्रल्ल्रूं’ ु१ीं२३ ी७ें)
४ मॅमोग्राफी - स्तनाची तपासणी ७१ं८ द्वारे केली जाते. ४) े१्र , ू३ वगैरे तपासण्या २ू१ीील्ल्रल्लॅ साठी नसून, आजार झाल्यास त्याची व्याप्ती समजण्यासाठी करतात.
(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग व
प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Breast cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.