लाच प्रकरणाने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2016 12:11 AM2016-09-26T00:11:06+5:302016-09-26T00:11:06+5:30

नांगरे-पाटील प्रबोधन करणार का? : शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षही आश्चर्यकारकच

The bribe of the bribe of the police | लाच प्रकरणाने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

लाच प्रकरणाने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर

Next

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी
येथील एका मोठ्या पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी महिन्याचा हप्ता ठरवून मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आणि पोलिस दलात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पोलिस खात्याची अब्रू मात्र चव्हाट्यावर आली. एकीकडे व्याख्याने देऊन समाजाचे प्रबोधन करू पाहणारे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आता पोलिस दलात प्रबोधन करून अशा प्रवृत्तीला आळा घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाणे गणले जाते. याआधी अनेक अधिकारी या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारण्यासाठी धडपडत होते. त्याचे मुख्य कारण यानिमित्ताने पुढे येत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यावसायिक, क्लबचालक, मटकाकिंग, गुटखाकिंग, गावठी दारू विक्रेते अशा अनेक लहान-मोठ्या माशांना गळाला लावून महिन्याला ‘कलेक्शन’ करणे नियमितपणे सुरू असल्याचे उघड होताना दिसत आहे. या कलेक्शनसाठी विशेष प्रावीण्य असलेला एखादा ‘विष्णू’ अधिकाऱ्यांना हाताशी लागतोच. आपण नामानिराळे राहत त्याच्यामार्फत सर्व माया एकत्रित केली जाते, हे आता स्पष्ट होत आहे.
पोलिस अशा कामांसाठी काही झीरो पोलिस, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांना नेमून हा स्वतंत्र कारभार चालवतात. अशा कार्यकर्त्यांची माहिती गेल्या महिन्यात मागविण्यात आली. त्यावेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असती तरी अशा बेअब्रूपणाला थोडा तरी लगाम लागला असता. मात्र, वरिष्ठांचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षही ‘आश्चर्यकारकच’ म्हणावे लागेल. पोलिस निरीक्षक गायकवाड यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच डॅशिंग पद्धतीने सुरू झाली. तीन महिन्यांत त्यांनी बराच ठसा उमटविला. मात्र, अशा एखाद्या ‘विष्णू’च्या भूलभुलैयाला बळी पडल्याने त्यांना कारवाईलासामोरे जावे लागले. त्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचे पोलिस ठाण्यात बोलले जात होते.
पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवावा व सर्वसामान्य नागरिकांशी सलोख्याने वागावे, असे आदेश वरिष्ठांकडून आहेत. मात्र, पोलिस ठाण्यात नेमके याउलट घडते. गुन्हेगारांशी मैत्रीचे नाते घट्ट करत त्यांच्याशी सलगी करून आपला फायदा करून घेण्यातच पोलिसांना रस दिसतो. यामध्ये एखादा प्रामाणिक पोलिस मध्ये आलाच तर त्याला दुसऱ्याच कामावर नेमले जाते. त्याच्यावर होणारा अन्याय सरळपणे दिसतो. मात्र, कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नांगरे-पाटील यांनी पोलिस दलाचे प्रबोधन करत त्यांना भटकटलेल्या मार्गावरून पुन्हा रूळावर आणणे गरजेचे बनले आहे.
‘आ बैल मुझे मार’
गुटख्याचे अनेक गुन्हे दाखल असलेला पाच्छापुरे हा ‘लाचलुचपत’ विभागाला तक्रार करून अडकवितो, ही माहिती सर्वांना माहीत आहे. कारण याआधी त्याने सातजणांना अडकविले आहे.
त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई करायची सोडून त्याच्याकडे हप्ता (लाच) मागण्याचे धाडस म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ या म्हणीप्रमाणेच असल्याचे दिवसभर पोलिस वर्तुळात बोलले जात होते

Web Title: The bribe of the bribe of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.