सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:44+5:302020-12-30T04:32:44+5:30

संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, ...

A bribe of Rs 21 lakh 50 thousand to three for a job in the army | सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

सैन्यदलात नोकरीसाठी तिघांना २१ लाख ५० हजारांचा गंडा

Next

संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली, तसेच त्याचा साथीदार रोहित मारुती मुळीक (मु. पो.भादवण, ता. आजरा, जि.कोल्हापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.

तक्रारदार शिवाजी फड हा मित्र नवनाथ मुंडे (रा.बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि.लातूर) यांच्यासह शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी पोवारला भेटले. त्यावेळी त्याने, रोहित मुळीक याच्या मदतीने परीक्षा न देता त्यांना थेट कॉन्टेन्मेंट बोर्डामध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देतो, सांगून प्रत्येकाकडे आठ लाखांची मागणी केली. पीरवाले याने तानाजीला पैसे दिल्यानंतर त्याला त्याच दिवशी सैन्यात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.

दि. ३ ऑक्‍टोबर २०१९ ला संग्राम राठोडने सात लाख रुपये, शिवाजी फड व नवनाथ मुंडे यांच्यासाठी दोघांच्या नातेवाईकांनी तानाजीकडे एकूण १६ लाख रुपये तानाजीकडे दिले. त्यांनाही नियुक्तीपत्रे दिली.

शिवाजीसह संग्राम, नवनाथ यांना आर्मी कॅम्प (झांशी) येथे हजार राहण्यास सांगितले. दि. १४ ऑक्टोबर २०१० ला तिघे झांशी येथे पोहोचले. तेथे वीरेंद्र नावाच्या तरुणाने त्यांना कॉन्टोन्मेंट बोर्डचे फोटो, शिक्का, सही व नाव-नंबर असलेले ओळखपत्र तिघांना दिले. वीरेंद्रने शिवाजी आणि नवनाथला आर्मी कॅम्पमध्ये नेऊन दोघांकडून कॅम्पमध्ये कचरा काढणे, रंगरंगोटी काढण्याची कामे करून घेतली. त्यामुळे शिवाजीला फसल्याचा संशय आला. त्याने तानाजीला फोनवर संपर्क साधला पण त्याने तो टाळला, त्यामुळे तिघेही झांशीहून गावी परतले. त्यांनी दि. सप्टेंबर २०१९ पासून आजपर्यंत फसवणूक झाल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान धुगे करत आहेत.

फोटो नं. २८१२२०२०-कोल-तानाजी पोवार(आरोपी)

Web Title: A bribe of Rs 21 lakh 50 thousand to three for a job in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.