वऱ्हाड निघालंय लंडनला हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:30+5:302021-02-05T07:16:30+5:30

कोल्हापूर : प्रा. डॉ. कै. लक्ष्मण देशपांडे लिखित अभिनेते संदीप पाठक यांच्या अभिनयाने नटलेला व वऱ्हाड निघालंय लंडनला या ...

The bridegroom left London full of houses | वऱ्हाड निघालंय लंडनला हाऊसफुल्ल

वऱ्हाड निघालंय लंडनला हाऊसफुल्ल

Next

कोल्हापूर : प्रा. डॉ. कै. लक्ष्मण देशपांडे लिखित अभिनेते संदीप पाठक यांच्या अभिनयाने नटलेला व वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचा प्रयोग रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत रंगला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त याचे आयोजन करण्यात आले होते.

सुुरुवातीला अभिनेते भरत जाधव व संदीप पाठक यांच्या हस्ते प्रफुल्ल महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या नाट्य अनुदान समितीवर निवड झाल्याबद्दल आनंद कुलकर्णी यांचा भरत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या दहा महिन्यांनंतर हा नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल गर्दीत झाला. यावेळी महाजन यांचे कुटुंबीय, गिरीश महाजन, सिनेअभिनेत्री उषा नाईक, शिवकुमार हिरेमठ, अशोक जाधव, हेमसुवर्णा मिरजकर, सुभाष गुंदेशा, श्रीकांत जोशी, दिलीप गुणे आदी उपस्थित होते. डॉ. शशिकांत चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

--

फोटो नं २४०१२०२१-कोल-वऱ्हाड निघालंय लंडनला

ओळ : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाचा प्रयोग झाला. नाटकाच्या शुभारंभप्रसंगी गिरीश महाजन, अभिनेते संदीप पाठक, भरत जाधव, आनंद कुलकर्णी, प्रा. डॉ. शशिकांत चौधरी उपस्थित होते.

--

Web Title: The bridegroom left London full of houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.