संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:58+5:302021-06-17T04:16:58+5:30

इचलकरंजी : सामाजिक बांधिलकी जपत शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत नगरपालिकेने सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा व मुसळे येथील कोविड केंद्राला ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

इचलकरंजी : सामाजिक बांधिलकी जपत शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत नगरपालिकेने सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा व मुसळे येथील कोविड केंद्राला सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, मास्क, हॅण्डग्लोज हे साहित्य दिले. चंद्रकांत कामत, किशोरी भुसारी, सुयोग कामत, अनिकेत गुरसाळे, विवेक कोरे, गुड्डू शेख यांनी हे साहित्य सभापती संजय केंगार व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्याकडे सुपूर्द केले.

१५ हजार शेणी दान

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील कॅटरर्स असोसिएशनकडून आर्यचाणक्य अंत्यसंस्कार सेवा केंद्रास पंधरा हजार १५१ शेणी देण्यात आल्या. या वेळी कॅटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुकानदारांकडून पायमल्ली

कबनूर : सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक व्यवसायाव्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तरीही गावामध्ये काहीजणांकडून याची पायमल्ली होताना दिसत आहे. तलाठी एस. डी. पाटील व ग्रामसेवक बी. टी. कुंभार यांच्यात ही बाब लक्षात आली.

वायचळ यांना आदर्श लोकसेवक पुरस्कार

इचलकरंजी : येथील लायन्स क्लबच्यावतीने सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वायचळ यांना आदर्श लोकसेवक हा पुरस्कार देण्यात आला. वायचळ यांनी आठवड्यापूर्वी झालेल्या अपघातात एक वर्षाची मुलगी गाडीवरून पडून रस्त्यावर पडली होती. त्यावेळी वायचळ या आपल्या पथकासमवेत गस्त घालत होत्या. ही घटना समजताच त्यांनी त्या मुलीला आपल्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयत दाखल केले. या कार्याची दखल घेत क्लबने त्यांचा गौरव केला. या वेळी महेश सारडा, ललिता जोशी, संगीता सारडा, मधू धूत, राकेश धूत आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

१५०६२०२१-आयसीएच-०२

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वायचळ यांना लायन्स क्लबकडून आदर्श लोकसेवक पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.