संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:36+5:302021-06-18T04:16:36+5:30

शिरोळ : माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य सहयोग दीपावली व इंद्रधनुष्य यांच्या ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

शिरोळ : माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य सहयोग दीपावली व इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचे गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केली जाते. या वर्षीही ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपल्या कथा ३१ ऑगस्ट पूर्वी पाठवाव्यात, असे आवाहन सुनील इनामदार यांनी केले आहे.

अब्दुललाट कोविड सेंटरला मदत

अब्दुललाट : येथील कोविड सेंटरला गजानन रायकर (दत्तवाड) यांनी आपल्या वाढदिनाच्या खर्चाला फाटा देत आर्थिक स्वरूपात मदत केली. ही मदत कोविड सेंटरला आधारवड ठरली आहे. लोकसहभागातून उभारलेल्या या कोविड सेंटरसाठी दातृत्वांनी पुढे यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी राहुल माळगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जानकी वृद्धाश्रमाला मदत

जयसिंगपूर : घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमास योगअमृत ट्रस्टच्या माध्यमातून धान्य स्वरूपात मदत करण्यात आली. या मदतीमुळे वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. या वेळी आशा बन्ने, संध्या चव्हाण, बबन बन्ने, नंदकुमार माने, एस. वाय. पाटील, उज्ज्वला नातू, बाबासाहेब पुजारी, दगडू माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.