संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:10+5:302021-06-22T04:17:10+5:30
इचलकरंजी : गंगामाई गर्ल्स हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर यांनी व्यायाम ...
इचलकरंजी : गंगामाई गर्ल्स हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर यांनी व्यायाम व योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले. श्रद्धा चावरे व सेजल सुतार या विद्यार्थिनींनी विविध आसने करून दाखवली. यावेळी उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. भस्मे, व्ही. एन. कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभागप्रमुख शेखर शहा यांनी केले.
रामदास कोळी यांची निवड
इचलकरंजी : स्वाभिमानी पक्ष इचलकरंजी शहर अध्यक्षपदी रामदास कोळी यांची निवड झाली. शेतकरी, कामगार, उद्योजकांचा मेळावा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी निवडीचे पत्र कोळी यांना दिले. अण्णासाहेब शहापुरे यांनी स्वागत केले. यावेळी गोवर्धन दबडे, बसगोंडा बिरादार, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे आदी उपस्थित होते. विकास चौगुले यांनी आभार मानले.
पाइपलाइन कामाचा प्रारंभ
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील वाढीव वसाहत ठाकरेनगर येथे जि. प. सदस्य प्रसाद खोबरे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन कामाचा प्रारंभ झाला. यावेळी सरपंच यशवंत वाणी, अंजना शिंदे, अशोक चौगुले, सचिन पोवार आदी उपस्थित होते.