संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:50+5:302021-06-23T04:17:50+5:30
जयसिंगपूर : शहरातील किराणा दुकानामध्ये मंगळवारी गर्दी दिसून आली. साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच दिसून आले नाही. ...
जयसिंगपूर : शहरातील किराणा दुकानामध्ये मंगळवारी गर्दी दिसून आली. साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच दिसून आले नाही. त्यामुळे पालिकेने अशा नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आहे. कोरोना आटोक्यात येत असतानाच पुन्हा नागरिक गर्दी करुन कोरोनाला आमंत्रणच देत आहेत. त्यामुळे पालिकेकडून कारवाईची गरज आहे.
-------------------------
पाणी पातळी ओसरू लागली
शिरोळ : गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील वारणा, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे नदीकाठची पाण्याखाली गेलेली शेती आता मोकळी होत आहे. पाण्यामुळे गवती कुरण पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ओल्या चा-याचे मोठे नुकसान शेतक-यांना सहन करावे लागले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
------------------------
कोविड सेंटरला मदत
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील माऊली कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये रुग्ण उपचार घेत असून अनेक दातृत्वांकडून आर्थिक स्वरूपात तसेच साहित्याच्या स्वरूपात मदत केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याठिकाणी डॉ. अविनाश सुतार यांच्यासह आशा स्वयंसेविका सेवा देत आहेत.