संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:36+5:302021-06-26T04:17:36+5:30
इचलकरंजी : येथील रोटरी क्लबला रोटरी गव्हर्नर संग्राम पाटील यांनी भेट दिली. त्यांनी दिव्यांग व्यक्तीस तीनचाकी सायकल प्रदान केली. ...
इचलकरंजी : येथील रोटरी क्लबला रोटरी गव्हर्नर संग्राम पाटील यांनी भेट दिली. त्यांनी दिव्यांग व्यक्तीस तीनचाकी सायकल प्रदान केली. तसेच आशा वर्करना सॅनिटरी नॅपकीन व छत्र्यांचे वाटप केले. अध्यक्ष अभय यळरुटे यांनी वर्षभर झालेल्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी दीपक निंगुडगेकर, महेश दाते, मनीष मुनोत, डॉ. अभिजित कलावडे, अनिल भुतडा, उत्कर्षा पाटील, मेघा यळरुटे, आदी उपस्थित होते.
ऑनलाइन कार्यशाळा
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे होते. इतिहास विभागामार्फत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज : जीवन व कार्य’ या विषयावर कार्यशाळा झाली. डॉ. सुरेश शिखरे व ई.आर. मचाले यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर विचार मांडले. प्रा. अरुण कटकोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विशाल गोडबोले यांनी आभार मानले.