संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:21+5:302021-06-11T04:16:21+5:30
इचलकरंजी : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनची महिला शाखा सुरू करण्यात आली आहे. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे ...
इचलकरंजी : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनची महिला शाखा सुरू करण्यात आली आहे. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रवींद्र जावळे यांनी केले. या वेळी संजना हेब्बाळकर, जयश्री सुतार, रूपा गिरंगे, सविता येलपले, सोनाली चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
संचिता साखरे प्रथम
इचलकरंजी : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने इयत्ता सहावी व नववीसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक ऑनलाईन पद्धतीने लेखी, प्रात्यक्षिक, मुलाखत व कृती संशोधन या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील मराठी मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी संचिता सचिन साखरे हिने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल तिचा अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे यांनी सत्कार केला.
रोटरी क्लबकडून औषधाची मदत
इचलकरंजी : येथील रोटरी क्लबने अब्दुललाट (ता.शिरोळ) कोविड केंद्रास ४० हजार रुपयांची औषधे दिली. डॉ. भूषण यमाटे यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. या कोविड केंद्रात शिरोळ तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. या वेळी संजयसिंह गायकवाड, विमल बंब, श्रीकांत राठी, सुभाष अक्कोळे आदी उपस्थित होते.