संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:51+5:302021-06-29T04:16:51+5:30

इचलकरंजी : शहरातील तृतीयपंथी समुदायास कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष र. ना. बावनकर ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

googlenewsNext

इचलकरंजी : शहरातील तृतीयपंथी समुदायास कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष र. ना. बावनकर व जिल्हा न्यायाधीश १ यांच्या मार्गदर्शनाखाली ही लस दिली. या वेळी शशिकला बोरा, अ‍ॅड. व्ही. चव्हाण उपस्थित होते.

मुन्ना हारूगिरी यांची निवड

इचलकरंजी : राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या इचलकरंजी विधानसभा अध्यक्षपदी मुन्ना ऊर्फ तौसिफ आझाद हारूगिरी यांची निवड झाली. जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर यांनी ही निवड जाहीर केली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांनी दिले. निवडीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व नाविद मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले.

फोटो ओळी

२८०६२०२१-आयसीएच-०१-मुन्ना हारूगिरी

अंगणवाडीची पायाखुदाई

तारदाळ : येथील ठाकरेनगरमधील नूतन अंगणवाडीच्या पायाखुदाईचा प्रारंभ जि. प. सदस्य प्रसाद खोबरे व सरपंच यशवंत वाणी यांच्या हस्ते करण्यात आला. अंगणवाडीसाठी अनेक वर्षे जागा उपलब्ध नसल्याने अंगणवाडी खोली भाडेतत्त्वावर चालत होती. ही बाब ग्रामपंचायतीने लक्षात घेऊन ठाकरेनगर येथे जागा उपलब्ध करून दिली. या वेळी उपसरपंच सुधाकर कदम, चंद्रकांत तांबवे, मनीष कांबळे, सचिन पवार, उदय कोळी यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.