संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:42+5:302021-06-30T04:15:42+5:30
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंध लस देण्यात येत आहे. परंतु केंद्रामध्ये लसीचा तुटवडा ...
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंध लस देण्यात येत आहे. परंतु केंद्रामध्ये लसीचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामस्थ लस न घेता परतत आहेत. तरी प्रशासनाने या केंद्रावर लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
हेलन केलर यांची जयंती साजरी
इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील रोटरी डेफ स्कूलमध्ये हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली. विश्वराध्य होनमुर्गीकर यांनी प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास भरत पवार यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष गांगोडे यांनी केले. मुसा शेख यांनी आभार मानले.
व्यापाऱ्यांचा बंदला साथ
इचलकरंजी : शहरात गेल्या ९० दिवसांपासून बंद असलेली दुकाने व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश झुगारात उघडली. मात्र, कोल्हापुरातील बैठकीत दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवून साथ दिली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. मुख्य मार्गावर काही विक्रेते व व्यापारी दुकानाबाहेर थांबून ग्राहकांना सेवा देत होते.
शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे शेती विभागाच्यावतीने खत बचतीची शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कृषी सहायक प्रदीप कोळी यांनी माहिती सांगितली. माती परीक्षणासाठी फिरती प्रयोगशाळा, बियाणे लवकर उपलब्ध व्हावीत, यांसह विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या वेळी जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, अभिनंदन पाटील, डी. बी. पिष्टे, शीतल पाटील, चंद्रकांत चवरे आदी उपस्थित होते.