संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:09+5:302021-07-07T04:30:09+5:30

इचलकरंजी : माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण गोसेवा प्रतिष्ठान येथे गायींना चारा देण्यात आला. सुमारे ४०० पेंडी ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

इचलकरंजी : माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनारायण गोसेवा प्रतिष्ठान येथे गायींना चारा देण्यात आला. सुमारे ४०० पेंडी चारा प्रतिष्ठानला सुपुर्द केल्या. यावेळी नगरसेवक राजू बोंद्रे, शेखर शहा, नाना पाटील, मारुती चव्हाण, शिवप्रसाद व्यास, शरद बाहेती आदी उपस्थित होते.

पोलीस मित्र कार्यालयाचे उद्घाटन

कबनूर : येथील सरस्वती अपार्टमेंटजवळ पोलीस मित्र समिती हातकणंगले तालुका कार्यालयाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले. यावेळी कोविड योद्धा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, सरपंच शोभा पोवार, विकास जाधव, संजय चोपडे आदी उपस्थित होते.

अब्दुललाट उपसरपंचपदी अण्णाप्पा कचरे

अब्दुललाट : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अण्णाप्पा आप्पा कचरे यांची बिनविरोध निवड झाली. छाया शेळके यांनी मागील महिन्यात उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर कचरे यांची निवड झाली. यावेळी सरपंच पांडुरंग मोरे, मिलिंद कुरणे, छाया शेळके, कल्लाप्पा कुमटोळे, स्वप्निल सांगावे, सचिन पाटील, ज्योती चौगुले, प्रमोद कांबळे व ग्रामसेवक ए. आय. मुल्ला उपस्थित होते.

फोटो ओळी

०६०७२०२१-आयसीएच-०१-अण्णाप्पा कचरे

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.