संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:13+5:302021-07-07T04:30:13+5:30
शिरोळ : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी ...
शिरोळ : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमास शिरोळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वृद्धांना सॅनिटायझर व मास्कही देण्यात आले. मिळालेल्या या आधारामुळे वृद्धांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. वृद्धाश्रमचालक बाबासाहेब पुजारी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी सईद पिरजादे, प्रदीप आयगोळे, दीपा मुंगळे, रुकया केरुरे, सुधाकर तावदारे, राजू देशमुख, अजय देशमुख, महादेव तलवार, किसन चौगुले, बंडा परीट, संजय मेंगे उपस्थित होते.
-----------------------
कोविड नियमांचे पालन करा
जयसिंगपूर : शहरात दररोज कोरोनाचे दहा ते पंधरा रुग्ण सापडत असल्याने नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. गर्दी टाळून शारीरिक अंतर ठेवावे. विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही काहीजण अजूनही या नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे.
-------------------
रस्ता डांबरीकरण करा
शिरोळ : शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सध्या या मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. हा रस्ता राज्य मार्गामध्ये येत असल्याने लवकरच या मार्गावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरात लवकर डांबरीकरण करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.