संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:23+5:302021-06-11T04:16:23+5:30

गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील रॅपिड अ‍ॅंटिजन तपासणीत ५२ सुपरस्प्रेडरपैकी एक जण पॉझिटिव्ह आला. या वेळी उपसरपंच अक्षय ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील रॅपिड अ‍ॅंटिजन तपासणीत ५२ सुपरस्प्रेडरपैकी एक जण पॉझिटिव्ह आला. या वेळी उपसरपंच अक्षय पाटील, एल. टी. नवलाज, ग्रामसेवक आर. बी. पाटील, शशिकांत कांबळे, उचगावकर उपस्थित होते.

तुडये ग्रामपंचायत इमारत बांधकामास प्रारंभ

गडहिंग्लज : तुडये (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामास समारंभपूर्वक प्रारंभ झाला. सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते कॉलम पूजन झाले. या वेळी ग्रा. पं. सदस्य प्रियांका झाजरी, सविता हुलजी, मनोहर कनगुटकर, अरुण पाटील व अरुण गुरव, प्रताप हुलजी, गणपती कोरजकर, मारुती पाटील, मारुती नाकाडे, भिकाजी पाटील, संजय कोलकर, संभाजी कांबळे, हनुमंत कांबळे आदी उपस्थित होते.

भडगाव येथील ११५ शेतकरी वंचित

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील ११५ शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. रीतसर अर्ज आणि वेळोवेळी सर्व प्रकारची माहिती देऊनही त्यांना गेल्या ३ वर्षांपासून एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी आहे.

गडहिंग्लजला केडीसीसी कॉलनीत नागरिकांकडून वृक्षारोपण

गडहिंग्लज : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केडीसीसी कॉलनीत वृक्षारोपण केले. माजी वनपाल धोंडिबा काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी कॉलनीतील खुल्या जागेत आंबा, चाफा, फणस, वड, पिंपळ, करंजी वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी विठ्ठल मोरे, प्रकाश पोवार, गणपतराव चौगुले, रघुनाथ देसाई, संभाजी लोंढे, सुरेश यादव, महेश पोवार उपस्थित होते.

मुत्नाळमध्ये शाळा परिसराची स्वच्छता

गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर प्राथमिक शाळा परिसराची ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता करण्यात आली. शाळेच्या आवारात आणि बागेत वाढलेले गवत कापून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या वेळी उपसरपंच अक्षय पाटील, सदस्य एल. टी. नवलाज, ग्रामविकास अधिकारी आर. व्ही. पाटील यांच्यासह प्राथमिक शाळेचा सर्व शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

गडहिंग्लजला व्यापाऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडहिंग्लज : गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (१०) सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेली सर्व दुकाने आणि व्यवसाय पूर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला.

सध्या दुपारी ४ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. ही वेळ वाढवून सर्व व्यवहार खुले करण्याची मागणी शहरातील सर्व व्यापार्‍यांनी केली आहे. बंदमध्ये सहभागी व्यापार्‍यांनी १२ नंतर ४ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवली होती.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.