संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:37+5:302021-07-10T04:16:37+5:30
शिरोळ : तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने खरिपाची पेरणी केलेला शेतकरी सुखावला ...
शिरोळ : तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने खरिपाची पेरणी केलेला शेतकरी सुखावला आहे. सध्या खरीप पेरणी झाली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाले होते.
----------------------
शामला महाडिक यांना पीएच.डी.
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील डॉ. शामला राजाराम महाडिक यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी. ही पदवी जाहीर केली. डॉ. महाडिक यांनी डिझाईन ऑफ क्टिव अॅन्ड पॅसिव्ह मल्टीबँड मायक्रो स्ट्रिप अँटेना फॉर इमर्जिंग वायरलेस टेक्नॉलॉजी या विषयावर शिवाजी विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. या संशोधनासाठी डॉ. महाडिक यांना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. यु. एल. बोंबले यांचे मार्गदर्शन तर डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूरचे अध्यक्ष विजय मगदूम यांचे सहकार्य लाभले.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०४-डॉ.शामला महाडिक
-------------------------
अर्जुनवाडमध्ये शिक्षकांचा सत्कार
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) शिरोळ तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए. बी. मगदूम, डी. पी. कदम, सुनीता जोंग, मोहन कांबळे, यु. आर. इंगळे, अशोक पवार, व्ही. जी. सुतार, विजयकुमार कांबळे, श्रेया वांजळे, सीमा कागवाडे उपस्थित होते.