संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:32+5:302021-07-15T04:17:32+5:30

इचलकरंजी : इनरव्हिल क्लबतर्फे न्यूट्री किचन गार्डन स्पर्धा आयोजित केली आहे. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक खाण्याची जरूरी आहे. याचेच महत्त्व ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

Next

इचलकरंजी : इनरव्हिल क्लबतर्फे न्यूट्री किचन गार्डन स्पर्धा आयोजित केली आहे. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक खाण्याची जरूरी आहे. याचेच महत्त्व जाणून अनेकांच्या अंगणात व टेरेसवर अशाच प्रकारची बाग पाहण्यास मिळते. या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी क्लबने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी गार्डनचा दोन मिनिटांचा व्हिडिओ पाठवायचा आहे. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख १९ जुलै आहे. अधिक माहितीसाठी क्लबशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

वृषभ जैन यांची निवड

इचलकरंजी : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त समर्थ बूथ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रमुखपदी वृषभ जैन यांची निवड भाजप शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केली. निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी दिले. यावेळी अरुण कुंभार, अमर कांबळे, अरविंद र्श्मा, शहाजी भोसले, किसन शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.