संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:04+5:302021-07-21T04:17:04+5:30
इचलकरंजी : इयत्ता बारावीमधील श्रेणी सुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३१ जुलैला लावावा, अशा मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र ...
इचलकरंजी : इयत्ता बारावीमधील श्रेणी सुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३१ जुलैला लावावा, अशा मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डी.बी. कुडाळ यांना दिले. शिष्टमंडळात सॅम आठवले, अभिषेक घोडगिरे, कृष्णा जावीर यांचा समावेश होता.
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अनुदान
इचलकरंजी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२१-२२ सालासाठी ड्रॅगन फ्रुट या पिकाचे अर्ज शेतकऱ्यांकडून घेण्यात येणार आहेत. महाडीबीटी या संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहेत. या वर्षात कृषी खात्याकडून ड्रॅगन फ्रुट या फळपिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
बकरी ईदची नमाज नाही
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार आज, बुधवारी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज होणार नाही, असे प्रसिद्धी पत्रक हजरत सय्यद मगदुमवली दर्गा-इदगा ट्रस्टने दिले आहे.