संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:44+5:302021-07-22T04:15:44+5:30
इचलकरंजी : थोरात चौकातील खवरे मार्केटमधील वृक्षारोपणाबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी संबंधितांना दिले. व्हिजन इचलकरंजी ...
इचलकरंजी : थोरात चौकातील खवरे मार्केटमधील वृक्षारोपणाबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी संबंधितांना दिले. व्हिजन इचलकरंजी संस्थेने या ठिकाणी ३५० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे निवेदन पोवार यांना दिले. शिष्टमंडळात कौशिक मराठे, अशोक पाटील, राजेश व्यास, अमित कुंभार, आदींचा समावेश होता.
व्यंकटेश महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची दोनदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय माने होते. कार्यशाळेत माजी विद्यार्थी व भालचंद्र ठिगळे यांनी इन्व्हेस्टमेंट अकौंटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी शेअर्स, कर्जरोखे, बॉँड यांतील गुंतवणुकीबद्दल माहिती सांगितली. यावेळी उपप्राचार्य डॉ. एन. एम. मुजावर, प्रा. एस. टी. बिरांजे यांनी मनोगत व्यक्त केले.
‘डीकेएएससी’मध्ये वेबिनार
इचलकरंजी : येथील डीकेएएससी महाविद्यालयात स्वपरिचय पत्रलेखन, समूह चर्चा, मुलाखत तंत्र या विषयांवर वेबिनार झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य व्ही. एस. ढेकळे होते. वेबिनारमध्ये योगेश बोरसे यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. व्ही. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. महेंद्र महाजन यांनी आभार मानले.