संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:45+5:302021-08-12T04:27:45+5:30
शिरोळ : शिरोळ तालुका पूरग्रस्त पुनर्रनिर्माण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १३) सकाळी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक ...
शिरोळ : शिरोळ तालुका पूरग्रस्त पुनर्रनिर्माण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. १३) सकाळी तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार कार्यालयास देण्यात आले आहे. पूरग्रस्त शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्यावे, शिधापत्रिकेवर ३० किलो गहू व तांदूळ तत्काळ द्यावे, यासह विविध मागण्यांप्रश्नी हे उपोषण होणार असल्याचे संतोष आठवले यांनी सांगितले.
---------------
भीम कायदा संघटनेचे निवेदन
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील पूर बाधित गावातील लोकांना तत्काळ सानुग्रह अनुदान द्यावे, अशा मागणीचे निवेदन भीम कायदा सामाजिक संघटनेच्यावतीने तहसीलदार कार्यालयास देण्यात आले. महापूर येऊ नये यासाठी उपाययोजना करावी. पूर बाधितांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात यावे. नदीकाठावरील बांधकामास परवानगी देऊ नये, यासह मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदनावर राहुल पोवार, गौतम वाघवेकर, अमोल मोहिते, बाळू केंगारे, सचिन कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------
रस्त्यावरील खडी धोकादायक
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी ते कुरुंदवाड मार्गावर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी वाहने जाऊन रस्त्यावर पसरत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्या खडीवरुन वाहने घसरत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ही खडी एकत्र करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.